चालू घडामोडी 2024/chalu ghadamodi 2024

मराठी चालू घडामोडी 2024

Daily chalu ghadamodi तर तुम्हाला माहीतच असेल की चालू घडामोडी हा किती महत्त्वाचा विषय आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित स्पर्धा परीक्षा साठी या विभागात काय अभ्यास करायचा आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा विषय अवकाशासारखा आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सर्व चालू घडामोडी बाबत. माहिती ठेवत नाही म्हणजेच अपडेट ठेवत नाहीत. तोपर्यंत तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकणार नाही .daily chalu gadhamodi आपल्याला सरकारी किंवा कोणत्याही एक्झाम मध्ये यश मिळण्यात मदत करू शकते.

1.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून ‘मानद डॉक्टरेट’ देऊन सन्मानित रण्यात आले. सदर विद्यापीठ कोणत्या देशात आहे ?

  1. भूतान
  2. नेपाळ
  3. श्रीलंका
  4. अफगाणिस्तान

Ans- नेपाळ 

स्पष्टीकरण :

✅नेपाळमधील विद्यापीठाकडून ही पदवी प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले.

✅लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले परदेशी नागरिक आहेत.

2.इंडिया मोबाईल काँग्रेस 2022 कोठे पार पडली ?

1.भोपाळ

2 बंगळुरू

3.मुंबई

4. नवी मुंबई

Ans- नवी दिल्ली

✅1 ते 4 ऑक्टोबर 2022 रोजी इंडिया मोबाईल काँग्रेस नवी दिल्ली येथे पार पडली.

✅ ही सहाव्या क्रमांकाची आवृत्ती होती.

✅आशियातील सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान मंच.

✅द्वारे – DOT CO-I

✅DOT – Department of Telecommunications (केंद्रीय दूरसंचार विभाग)

✅CO-I – Cellular Operators Association of India.

✅याच व्यासपीठावरून नरेंद्र मोदी यांनी 5-G सेवेचे लोकार्पण केले.

3.जागतिक ‘चंद्र दिन’ म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो ?

  1. 15 जुलै
  2. 16 जुलै
  3. 18 जुलै
  4. 20 जुलै

Ans- 20 जुलै

स्पष्टीकरण :

✅मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले 20 जुलै 1969.

✅अंतराळवीर – नील आर्मस्ट्राँग

✅ अपोलो-11 यानातून.

4.भाजप पक्षाच्या वतीने सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?

  1. शिवराज सिंह चौहान
  2. नरेंद्र मोदी
  3. डॉ. रमण सिंह
  4. वसुंधरा राजे शिंदे

Ans-शिवराज सिंह चौहान

स्पष्टीकरण :

✅मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री

✅15 वर्ष पूर्ण

✅चार वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झालेले शिवराज सिंह एकमेव आहेत.

5.महाराष्ट्राचे नवनियुक्त 20 वे राज्यपाल रमेश बैस यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपालपद

भूषविले आहे ?

  1. झारखंड, त्रिपुरा**
  2. मणिपूर, केरळ
  3. मध्यप्रदेश, राजस्थान
  4. तामिळनाडू, तेलंगणा 

Ans-झारखंड, त्रिपुरा

स्पष्टीकरण :

✅ मूळचे छत्तीसगडचे

6.15 व्या वित्त आयोगाच्या अंतिम अहवालानुसार केंद्राकडून राज्यांना मिळणारा कर महसुलातील वाटा % असावा असे अहवालात सांगितले ?

  1. 41%**
  2. 42%
  3. 43%
  4. 44%

Ans- 41%

स्पष्टीकरण :

✅अहवाल संसदेत सादर-1 फेब्रुवारी 2021

✅एकूण 117 मुख्य शिफारशी आहेत

✅अहवाल एकूण चार खंडात आहे.

✅15 वा वित्त आयोग –

           ∆स्थापना – नोव्हेंबर 2017

           ∆अध्यक्ष – एन. के. सिंह

           ∆कालावधी 2020-25

6.पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला ?1.

1.नरेंद्र मोदी

2.पंडित हरिप्रसाद चौरसिया

3.उद्धव ठाकरे

4प्रकाश आमटे

 

Ans-नरेंद्र मोदी

स्पष्टीकरण :

✅लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

> द्वारे – मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान

> क्रमांक – पहिला

>2022 चा नरेंद्र मोदी यांना प्रदान

✅लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार

> द्वारे – राज्यशासन सांस्कृतिक कार्य मंत्रालय.

> सुरूवात 1992, पहिला पुरस्कार – माणिक वर्मा

> स्वरूप- 5 लाख

2022 चा पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी वादक )

 

7)……………..या दिवशी जगातील लोकसंख्या 8 अब्जावर पोहोचली आहे ?

  1. 10 नोव्हेंबर 2022
  2. 11 नोव्हेंबर 2022
  3. 14 नोव्हेंबर 2022
  4. 15 नोव्हेंबर 2022**

Ans- 15 नोव्हेंबर 2022

स्पष्टीकरण :

✅संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर 2022 रोजी मनिला (फिलिपाईन्स) येथे एकाकन्येने जन्म घेतला आणि जगाच्या लोकसंख्येने अब्जांचा पल्ला गाठला.

✅संयुक्त राष्ट्राच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार-

> 2030 ला जगाची लोकसंख्या – 8.5 अब्ज

> 2050 ला जगाची लोकसंख्या – 9.7 अब्ज

2080 ला जगाची लोकसंख्या 10.4 अब्ज

8)2022 सालची ‘सुलतान अझलान शाह’ हॉकी स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?

1.मलेशिया

2.दक्षिण कोरिया

3.ऑस्ट्रेलिया

4.पाकिस्तान

Ans- मलेशिया

स्पष्टीकरण :

✅ मलेशियाने दक्षिण कोरियाला हरवून ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली.

✅1 ते 10 नोव्हेंबर 2022 दरम्यान, 29 व्या क्रमांकाची ही स्पर्धा मलेशिया येथे पार पडली.

✅मलेशियाचा राजा ‘सुलतान अझलन शाह’ हा हॉकीचा खूप चाहता होता. त्याच्या गौरवार्थ या

स्पर्धेला हे नाव देण्यात आले.

✅सुरूवात 1983

✅आतापर्यंत सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळविणारे देश ऑस्ट्रेलिया – 10 वेळा, भारत – 5 वेळा.

9..ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीची ऑर्डर देणारा………. हा पहिला परकीय देश ठरला आहे ?

  1. फिलिपाईन्स**
  2. श्रीलंका
  3. बांगलादेश
  4. नॉर्वे

Ans -फिलिपाईन्स

स्पष्टीकरण :

✅फिलीपाईन्स या देशाने यासाठी भारताबरोबर 375 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा करार केला आहे.

✅ब्राह्मोस क्षेपणास्त्र जगातील सर्वाधिक वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे.

✅निर्मिती DRDO/NPOM (रशिया)

✅स्फोटक वहनक्षमता- 200 ते 300 किलोग्रॅम

✅लांबी – 8.4 मीटर

✅ वजन-2500 ते 3000 किलोग्रॅम

✅जमीन व समुद्रातून डागल्यास 500 किमी 

✅ हवेतून डागल्यास-400 किमी

10)………… हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो?

  1. 23 डिसेंबर
  2. 25 डिसेंबर
  3. 24 डिसेंबर
  4. 26 डिसेंबर**

Ans-26 डिसेंबर

स्पष्टीकरण :

✅ साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या हौतात्माच्या स्मरणार्थ पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांनी 2022 पासून हा दिवस साजरा करण्याचे ठरविले.

✅23 डिसेंबर – राष्ट्रीय किसान दिन- भारताचे 5 वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिन.

 

11). ‘चितवन करार 2023’ कशासंदर्भातील आहे ?

1. चित्ता प्राणी संवर्धन

2. वाघांच्या संवर्धनासाठी

3. आशियाई गेंड्यांच्या संवर्धनासाठी

4. यापैकी नाही.

 

Ans- चित्ता प्राणी संवर्धन

 

स्पष्टीकरण :

✅नेपाळमधील चितवन येथे तिसरी ‘एशियन- हायनो रेज कंट्रीज मीटिंग’ ही परिषद पार पडली.

✅या वेळी पाच देशांनी आशियाई गेंड्यांच्या संवर्धनासाठी ‘चितवन करार 2023’ वर स्वाक्षऱ्या

केल्या.

✅यामधील पाच देश 1. भारत 2. भूतान 3. मलेशिया 4. नेपाळ 5. इंडोनेशिया

✅ एकशिंगी गेंडा, जावन गेंडा, सुमात्रन गेंडा या प्रजातींची संख्या दर वर्षी तीन टक्क्यांनी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला.

✅ चितवन परिषदेतील या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संभाव्य प्रकल्प म्हणून बिहारमधील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे.

✅भारतातील एकशिंगी गेंड्यांच्या संवर्धनाचा हा सर्वात मोठ ‘ब्रीडिंग प्रोग्राम’ आहे.

 ✅एकशिंगी गेंडा सर्वाधिक आसामधील काझीरंगा अभयारण्यात आढळतो.

12.97 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे?

(1) उस्मानाबाद

(2) अमळनेर

(3) उदगीर

(4) वर्धा

 

Ans- अमळनेर

 

✅पुणे या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या साहित्य मंडळाच्या बैठकीत, 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर (जि. जळगांव) या ठिकाणीआयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

✅पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे या ठिकाणी 1878 मध्ये न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

✅96 वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा या ठिकाणी संपन्न झाले असून, न्या नरेंद्र चपळगावकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.

✅अमळनेर हे शहर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हयातील एक तालुका आहे. हे शहर बोरी नदीच्या काठावर वसले आहे. बोरी ही तापी नदीची उपनदी आहे.

✅ मराठी भाषा गौरव दिन – 27 फेब्रुवारी

✅मराठी वृत्तपत्र स्पष्टीचे जनक :- आचार्य    

    बाळशास्त्री जांभेकर

✅ मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र :- दर्पन

✅महाराष्ट्रात पत्रकार दिन :- 06 जानेवारी

✅ मराठी रंगभूमी दिन :- 05 नोव्हेंबर

✅ आधुनिक मराठी कादंबरीचे जनक :- ह. ना. आपटे

✅आधुनिक मराठी कवितेचे जनक :- केशवसुत

13.खालीलपैकी कोणता दिवस भारतात ‘राष्ट्रीय पंचायती राज दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो?

(1) 22 एप्रिल

(2) 23 एप्रिल

(3) 24 एप्रिल

(4) 25 एप्रिल

Ans- 24 एप्रिल

 

✅भारतात दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो. 

✅24 एप्रिल 1993 या दिवशी 73 वी घटनादुरुस्ती करून भारतीय पंचायत राज व्यवस्था संवैधानिक ठरविण्यात आली.

✅भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी 24 एप्रिल 2010 रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली.

✅2011 पासून हा दिवस भारतात दरवर्षी साजरा करण्यात येत आहे.

 

14. भारताचे ज्योती वेन्नम व ओजस देवतळे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत.

1. तिरंदाजी

2. फुटबॉल

3. क्रिकेट

4. बॅडमिंटन

Ans-तिरंदाजी

 

✅ज्योती वेन्नम व ओजस देवतळे भारताचे तिरंदाजपट्टू

✅यांनी तुर्कीतील अंतल्या या ठिकाणी सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

✅त्यांनी मिश्र सांघिक स्पर्धेत चीनच्या तिरंदाजपटूंना नमवून हे पदक जिंकले आहे.

✅भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक :- लार्ड रिपन

✔️ भारतात पंचायत राज संस्था स्विकारणारे पहिले राज्य् :- राज्यस्थान 2 ऑक्टोबर 1959

 

✅महाराष्ट्र हे पंचायत राज व्यवस्था स्विकारणारे भारतातील नववे राज्य आहे.

15.भारतातील पहिली जल मेट्रो खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू आली करण्यात आहे?

1. केरळ

2. महाराष्ट्र

3. पश्चिम बंगाल

4. ओडिशा

Ans-केरळ

 

✅भारतातील पहिला वॉटर मेट्रो केरळमध्ये कोच्ची याठिकाणी सुरु करण्यात आली आहे.

✅उद्घाटन :- 25 एप्रिल 2023 – नरेंद्र मोदी

Imp Points :-

✅भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोची चाचणी-कोलकता 

✅राज्यातील पाच जिल्हयात मेट्रो सुविधा असणारे भारतातील पहिले राज्य :- उत्तरप्रदेश

✅मेट्रो मॅन ऑफ इंडिया : ई-श्रीधरण

✅पार्किंगसाठी डिजिटल करंसी स्वीकारणारी भारतातील पहिली मेट्रो उ कोची मेट्रो

 

✅भारतातील पहिली मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झाली :- कोलकाता